Thursday, 31 January 2019

१२ महिने २४ किल्ले ___ किल्ले-गडमाला वर्षभरातली

Torna Killa




 " १२ महिने २४ किल्ले "
किल्ले-गडमाला वर्षभरातली


"
एकंदरीत २०१९ हे वर्ष एकदम भन्नाट जाणारे असंच दिसतंय. कारण आता भरपूर फिरायचंय असा चंगच मनी बांधलाय. आभासी दुनियेतून बाहेर येऊन खर्याखुर्या दुनियेत फिरायचंय. कारण फिरल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतात. आपण प्रगल्भ बनत असतो आणि हो नेमकं तेच बनायचंय. पण नक्की कुठे फिरायचं, नक्की काय बघायचं हे अगोदरच नियोजित असणं गरजेचं वाटलं. त्यादृष्टीने विचार सुरु झाले, आणि त्याची ही भली मोट्ठी यादीच तयार झाली.
"



तसा मला इतिहास-भूगोलात जरा जास्तच रस आहे. शाळेत असताना त्या विषयात मिळालेल्या गुणांवरून तरी मला तसेच वाटायचे. हीच गोडी मी आजपावेतो जपत आलोय आणि 
शाळाबाह्य इतिहास पण वाचत आलोय. त्यात प्रामुख्याने "राजा शिव छत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याचा इतिहास" मला जास्त ओजस्वी आणि तेजस्वी वाटतो. कल्पनेतलं विश्व साकारणं आणि ते तसंच टिकवणं यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. यात शिवबांना बहुत जनांची साथ लाभली. त्यात अनेक शूरवीर मावळे, सरदार आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे रांगडा सह्याद्री हे होत.

सह्याद्रीच्या जोरावरच किंवा त्याच्या साथीनेच शिवबा हे स्वराज्यस्वप्न साकार करू शकले. आणि त्याच साकाराचा एकमेव साक्षीदार म्हणून तो अजूनही हयात आहे आणि राहील. हा सह्याद्री स्वराज्यस्थापनेच्या काळातल्या अनेक आठवणी आपल्या उदरात घेऊन त्या जपण्याचं काम करतोय. आणि हो एकदा का माझी त्याच्याशी जवळीक, आपुलकी झाली, कि तो या आठवणी मला सुद्धा सांगेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी या वर्षात सह्याद्रीशी जवळीक करणार आहे.

सह्याद्रीत असलेल्या गड किल्ल्यांना भेट देणार आहे. गडाच्या प्रत्येक शिळेत त्याकाळी घडलेल्या संवादाचे नाद ध्वनी अजूनही घुमत आहेत ते मी ऐकणार आहे. आणि ह्याच अनुभवलेल्या गोष्टी मी ह्या लेखमालेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे. ज्याचं शीर्षक आहे "१२ महिने २४ किल्ले". चला तर मग सुरु करूया हि सह्याद्री सफर माझ्या लेखमालेच्या माध्यमातून .

लिखित ब्लॉगला जोड म्हणून मी व्हिडीओ ब्लॉग सुद्धा बनवणार आहे, ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून माझ्या Youtube Channel ला Subscribe करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन मिळतील, आणि तुम्ही ते पाहू शकाल. 


https://www.youtube.com/channel/UCa8XZ51o53nDSRIJHhSsolw/featured?view_as=subscriber

२०१९ मध्ये येणाऱ्या १२ महिन्यातले २४ किल्ले कोणते? याचे वेळापत्रक मी लवकरच तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून देईनच. त्यासाठी माझ्या ह्या ब्लॉगला सुद्धा subscribe करा. म्हणजे वेळोवेळीचे अपडेट तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून मिळत राहतील. ब्लॉग कसा वाटतो याबद्दल बिनधास्त बोलत चला आणि तुमच्या मित्रांशी पण share करा.

तूर्तास एव्हढेच!

आता भेटूया गडमालेतल्या पहिल्या गडावर.

" तोरणा एक प्रचंडगड --- गरुडाचे घरटेच जणू " 
धन्यवाद.


किशोर पवार
९१५६७२०८७८ 

pawarkishorart3@gmail.com

_____________________________________________________________________________

2 comments:

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)

१२ महिने २४ किल्ले १.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे  हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे त...